Induction Program

Induction Program 

अशोकराव माने पॉलिटेक्निक,वाठार च्या Academic Year 2023- 24 मधील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी साठी आयोजित केलेला Induction Programme दि.30 ऑगस्ट, 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
कॉलेज चे प्राचार्य मा.श्री. वाय.आर.गुरव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ.श्री.सचिन कोंडेकर,प्राचार्य श्रीमती इंदिरा गांधी माध्य.विद्यालय व ज्यूनि.कॉलेज, पेठवडगाव यांच्या शुभहस्ते या Induction Programme चे उद्घाटन करण्यात आले.

"पाऊलखुणा महाराष्ट्राच्या" या विषयावरील डॉ. कोंडेकर यांच्या माहितीपूर्ण व्याख्यानाने विद्यार्थ्याना महाराष्ट्रातील ऐतिहासिक सफर घडवून आणली तर प्रा .सौ.अमीन मॅडम, HOD, E &TC यांच्या Career Opportunities After Engg. या विषयावरील करिअर मार्गदर्शनाने विद्यार्थ्याना इंजिनिअरिंग क्षेत्राची खरी ओळख प्राप्त झाली,

 प्रा.श्री.नागवेकर, Mech.Dept. यांच्या Yoga & Meditation या वरील मार्गदर्शना मुळे  विद्यार्थ्याना MSBTE ने नुकत्याच अंतर्भूत केलेल्या K Scheme मधील योगा च्या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली, तर प्रा .श्री.मयुरेश गोरड, प्रा.श्री.भरत घाटगे, श्री.नंदनवार, प्रा .श्री.सुहास लकडे, श्री.आनंद हाबळे व श्री.पवन शेटे यांनी सादर केलेल्या एकाहून एक सुरेल गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. फिनिक्स आर्टिस्ट ग्रुप , कोल्हापूर यांच्या तर्फे सादर झालेली एकांकिका " पुरुषार्थ" ने विद्यार्थी वर्गाला देशाच्या खऱ्या संस्कृतीची ओळख करून दिली, तर विभागप्रमुख श्री.सुनील यादव, श्री.प्रदीप हसबे,श्री.अमित वारके, श्री.सुहास लकडे, श्री.भास्कर कुंभार आणि सौ.सना अमीन यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याना आपापल्या शाखेची उत्तम माहिती मिळाली.
या Induction Programme साठी कॉलेज चे प्राचार्य मा.श्री.गुरव सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम वर्ष विभागप्रमुख श्री.P.M.Patil यांच्या नेतृत्वाखालील नेटके संयोजन, Applied Science Dept. च्या सर्व Teaching & Non Teaching Staff चे अथक परिश्रम आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचा भरघोस प्रतिसाद यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.या कार्यक्रमासाठी Miss.M.K.Patil मॅडम यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर सौ. आलटकर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.